• Total Visitor ( 133624 )

श्री संत शिरोमणी संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती

Raju Tapal December 09, 2021 53

श्री संत शिरोमणी संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती  तळेगाव ढमढेरे पुण्यनगरी मध्ये कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  क्रमांक 1चे  मुख्याध्यापक जयवंत भुजबळ, शाळा क्रमांक 2 मुख्याध्यापक अशोक राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवानजी  खुरपे यांच्या मार्गदर्शनानुसार करोना नियम पाळून साजरी करण्यात आली.यानिमित्त शाळा क्रमांक एक व शाळा क्रमांक दोन यांना श्री संताजी महाराज जगनाडे प्रतिमा भेट देण्यात आली व त्यांचे पूजन करण्यात  आले.या निमित्ताने सर्व मुलामुलींना फळे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शिरूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संतोष दादा शिंदे यांच्या वतीने अकरा झाडांचे वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रसंगी शिरूर तालुका पं स. माजी सभापती आरतीताई भुजबळ, ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे चे उपसरपंच नवनाथ काका ढमढेरे, शिरूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष संदिपअण्णा ढमढेरे, शिरूर तालुका आरपीआयचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, ग्रामपंचायत सदस्य जावेद बागवान, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य गोविंदजी ढमढेरे व तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे सर्व कर्तव्यदक्ष कर्मचारी तसेच तिळवण तेली समाजाचे दिलीप दादा शिंदे, अशोक जी केदारी संतोष केदरी मदन क्षीरसागर सुनील काका शिंदे लक्ष्मण जी बागुल नामदेव बागुल गणेश केदारी दिनेश शेठ दिवटे उमेश शेलार बाळासाहेब शिंदे रोहन रत्नपारखी महेंद्र शिंदे अभिजीत दिलीपराव शिंदे सिद्धेश संतोष शिंदे या सर्वांच्या उपस्थितीत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली .  माधुरी शेजवळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Share This

titwala-news

Advertisement