• Total Visitor ( 84532 )

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांचे निधन

Raju Tapal December 07, 2021 32

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांचे निधन 
        
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव प्रतापराव  गोडसे यांचे सोमवार दि.६/१२/२०२१ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. 
त्यांचे वय - ६५ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे.
सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालकही होते.
गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या कर्करोगाने ते आजारी होते.
त्यांच्यावर दोन आठवड्यांपासून ससून रूग्णालयात उपचार चालू होते. 
त्यांचा धार्मिक आणि सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता. 
जय गणेश ज्ञानवर्धन अभियान,जय गणेश रूग्णसेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान , जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्थन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान ट्रस्टच्या या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
अशोकराव गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरूण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरूवात केली. 
१९९६ पासून ते सुवर्णयुग तरूण मंडळाचे संचालक होते. २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली. २०१० पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते.
दरवर्षी होणा-या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

Share This

titwala-news

Advertisement