टिटवाळ्यात श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळा येथे असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मंडळाचे हे ३३ वे वर्ष असून या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने रविवारी सकाळी ८ ते १० वाजताच्या दरम्यान 'श्रीं' वर महाअभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी १०:३० ते १२ वाजता चौसष्ट कला संगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी १२:३५ वाजता प्रगट सोहळा व दर्शन त्यानंतर आरती आणि महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी ४ ते ५ वाजता वृदांवनी भगिनी भजन मंडळाचे भक्तांसाठी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर संध्याकाळी ७ वाजता महाआरती होऊन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पावन प्रसंगी परिसरातील भाविकानीं मोठ्या संख्येने उपस्तिथ राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.