रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक -मालक संघटना मांडा टिटवाळा शहर व राहुल जाधव प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री सत्य नारायण महापुजेचे आयोजन टिटवाळा रिक्षा स्टँड येथे करण्यात आले होते.
सकाळी सत्य नारायण पुजा संपन्न झाली. त्या नंतर आरती पुजन, तसेच स्वरांजली भजनी मंडळ टिटवाळा, गावदेवी भजनी मंडळ रूंदे,भावभक्ती भजन मंडळ, गजानन प्रासादिक भजन मंडळ मोस गाव,इत्यादी भजनी मंडळ सहभागी झाली होती.
तसेच यावेळी महाप्रसाद तसेच भंडारा आयोजित करण्यात आला होता. परिसरातील असंख्य भाविकांनी तसेच रिक्षा चालकांनी याचा लाभ घेतला. तसेच अनेक मान्यवरांनी सत्य नारायण महापुजाला भेट दिली. यावेळी रिक्षा संघटने कडून स्वागत करण्यात आले. तसेच रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी व युनियनचे प्रतिनिधी यांचे निधन झालेल्याना श्रंदाजली वाहण्यात आली.
यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष मोहन जाधव, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मांडा टिटवाळा अध्यक्ष देवा पाटील, सरचिटणीस प्रकाश जाधव, संघटक रवि रेड्डी, स्टँड अध्यक्ष शंकर चौधरी,भागवत गारगोळ,मनोज गायकवाड, हरिश्चंद्र भाकरे,खजिनदार सुरेश जाधव, भगवान घरत,विलास परटोले, रवि चन्ने, संदीप जाधव, पुष्पराज जाधव,चंद्रकांत गायकवाड, रामदास भोय,रोशन भोय,दिपक जाधव यांच्या सह रिक्षा संघटनेचे सदस्य चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मांडा टिटवाळा परिसरातील असंख्य माननीय व्यक्तींनी दर्शनाचा लाभ घेतला.