• Total Visitor ( 84578 )

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यात महानुभाव पंथानूसार अंत्यसंस्कार

Raju Tapal January 11, 2022 35

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यात महानुभाव पंथानूसार अंत्यसंस्कार ; शिरूर येथे विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा स्मशानभूमीत  बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महानुभाव पंथानूसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंधुताईंनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली असल्याने पंधाच्या संस्कारानुसार त्यांचा दफनविधी पार पडला. त्याआधी सरकारी इतमामात सलामी देण्यात आली. 

मंगळवारी दि.४ जानेवारीला रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. 

अंत्यसंस्कारास महापौर मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री विश्वजित कदम, उल्हास पवार, अभय छाजेड, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते. 

सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता सपकाळ, मानसपुत्र दीपक, विनय, अरूण, संजय, मनीष आदींनी पार्थिवाचे पुजन केले.

अमर रहे, अमर रहे सिंधुताई अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.विविध भागातून आलेल्या हजारो नागरिकांनी पार्थिवाचे दर्शन घेतले.

 शिरूर येथे विविध संस्था, संघटनांच्या वतीने सिंधुताईंच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजल्या नंतर शिरुरकरांनी त्यांच्या असंख्य आठवणी जागवत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली . सिंधुताई सपकाळ यांचे शिरुरकरांशी खास असे ऋणानुबंध जुळले होते त्यांची अनाथ मुलांसाठी काम करणारी संस्था शिरुर मधील रामलिंग रोड येथे असून  या संस्थेत कामानिमित्त त्याचे  नेहमी येणे व्हायचे या निमित्ताने शिरुर परिसरातील अनेकांशी त्यांचा संपर्क व्हायचा .सिंधुताई सपकाळ यांना शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना यांंच्या वतीने शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालया जवळ अभिवादन करण्यात आले. सिंधुताईंच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,  शिरुर मुद्रण संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे , बाजार समितीचे संचालक संतोष मोरे ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक मंगेश खांडरे , माजी नगरसेवक सुकुमार बोरा ,नगरसेवक मंगेश खांडरे,  शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  नितीनकुमार  बारवकर ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद ,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शशिकला काळे ,माजी सरपंच वर्षा काळे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे ॲड प्रदिप बारवकर ,नोटरी रवींद्र खांडरे ,  सागर नरवडे ,रावसाहेब चक्रे , अनिल बांडे , डॉ. वैशाली साखरे , तारुअक्का पठारे , शारदा भुजबळ ,तुषार वेताळ , सुशांत कुटे  यांसह विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन कार्याविषयी  माहिती देण्यात आली. प्रास्ताविक प्रा.सतीश धुमाळ यांनी केले .अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांंनी शिरूर  शहरात मन:शांती  ही संस्था सुरु केली असून याठिकाणी ४८ मुले  आहेत . या खेरीज शिरुर शहर परिसरातील विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांच्या विविध कार्यक्रमप्रसंगी त्यांनी उपस्थित राहून भाषणे केली होती. आपल्या भाषणातून स्वंत:च्या आयुष्याचा जीवनपट उलगडत असताना आपल्याला आयुष्यात आलेल्या विविध अडचणी ,निर्माण झालेले प्रश्न ,जीवनातील विविध प्रसंग घटना आपल्या विशिष्ट बोलीत त्या सांगायच्या  हे भाषण अत्यंत प्रभावी होते .त्यांचा जीवनप्रवास ऐकताना अनेक जणांचे डोळे पाणावले जात . संकटातुन मात करुन आयुष्य कसे जगायचे हे माई साध्या सोप्या  भाषेत सांगायच्या जणू जीवनाचे सार त्याच्या बोलण्यात असायचे .शिरुरला संस्थेत आल्या की माई भरुभरुन बोलायच्या आणि भविष्यातील विविध कामांविषयी सांगायच्या .माईंचे  आश्वासक  व जिंदगीला दिशा देणारे मार्गदर्शनपर बोल  आता नसणार  या कल्पनेच अनेक जण भावनाविवश झाले होते .

Share This

titwala-news

Advertisement