• Total Visitor ( 700938 )
News photo

गणेशोत्सव काळात कोकणात धावणार सोळा डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस!

Raju tapal August 25, 2025 77

गणेशोत्सव काळात कोकणात धावणार सोळा डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस!



मुंबई :- गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला ८ अतिरिक्त डब्बे वाढवण्यात यावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री मा.अश्विनी वैष्णव यांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत कोकणात जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यांची संख्या दुप्पटीने वाढवण्यास केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. यामुळे यापूर्वी आठ डब्यांची असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता सोळा डब्यांची होणार आहे.



या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल व प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर ठरेल. या स्तुत्य निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री मा.अश्विनी वैष्णव तसेच केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार !

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026