नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल - कोपरगाव तालुक्यातील जवळच असलेल्या सावळीविहीर बुद्रुक मधील सोमय्या नगर येथे महामानव फाउंडेशन च्या वतीने संविधान जागर सप्ताहाचा दुसरा कार्यक्रम संपन्न झाला असल्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सावळीविहीर बुद्रुकचे शहराध्यक्ष मा. रमेश भाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
महामानव फाउंडेशन यांच्या वतीने सावळीविहीर बु. मधील सोमय्या नगर येथे संविधान जागर सप्ताहाचा दुसरा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रथम महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सविधान पुस्तिकेचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हाध्यक्ष शिमोणजी जगताप मा. घोडेस्वार, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार
मा. सचिन जी बनसोडे, यांनी संविधानावर आधारित उपस्थितांना मार्गदर्शन केले. आरपीआय आठवले गटाचे सावळीविहीर बु. शहराध्यक्ष मा. रमेश भाऊ कसबे, पत्रकार अमर भाऊ झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ लिहिणार, सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ भोसले, व महामानव फाऊंडेशनचे मा. अरुण भाऊ त्रिभुवन, पप्पू भाऊ बोराडे, रिपब्लिकन चळवळीचे नेते व सर्व युवा मित्र परिवार आणि सोमय्या नगर व भारतीय बौद्ध महासभेचे मान्यवर यांच्या वतीने सहकार्य लाभले त्याबद्दल महामानव फाउंडेशन तर्फे आभार मानले.