गुजर प्रशालेत वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
शिक्रापूर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेतून तीन गटांमधून ही शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
लहान गटामध्ये प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे :-
आर्यन विधाते,काव्या आखाडे,चेतन कुरकुरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच मधल्या गटांमध्ये आनंदी टोणगे,श्रुतिका नांदखिले,अनुष्का शेळके मोठ्या गटामध्ये प्रगती पायगुडे,साक्षी ढमढेरे,राजश्री डुंबरे
या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे मानद सचिव अरविंद ढमढेरे प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे व उपप्राचार्या सुनीता पिंगळे यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी पालवी, अंकुर व गुलमोहर चित्रकला विषय संबंधित या तीन काच फलकांचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमांचे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, जेष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी कौतुक केले.