• Total Visitor ( 368976 )
News photo

भरधाव कंटेनरची दोन दुचाकींना धडक; जेष्ठ नागरिकाचा मृत्यू 

Raju tapal May 08, 2025 54

भरधाव कंटेनरची दोन दुचाकींना धडक; जेष्ठ नागरिकाचा मृत्यू 



शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर रस्त्यावरील घटना



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर रस्त्यावर भरधाव कंटेनरने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

दिलीप सुभाष खोचरे वय - ६८ रा.बजरंगवाडी, शिक्रापूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव असून हनूमंत संभाजी भुजबळ वय - ३७, अश्विनी हनुमंत भुजबळ वय - ३३ रा‌.माळीमळा, तळेगाव ढमढेरे असे अपघातात गंभीर जखमी पती-पत्नीचे नाव आहे.

हनुमंत भुजबळ हे त्यांच्या पत्नीसह दुचाकी क्रमांक एम एच - १२आर डी ९४९७ वरून शिक्रापूर कडे येत असताना पाठीमागून भरधाव कंटेनर क्रमांक एम एच ४२ बी ई ९८६९ ने भुजबळ यांच्या दुचाकीला धडक दिली.त्यानंतर या कंटेनरने आणखी एका दुचाकी क्रमांक एम एच १२ जे आर ६२२४ ला धडक देवून तसाच पुढे गेला.पुढे फुलांच्या दुकानात कंटेनर शिरत असताना कृष्णा गंभिरे या युवकाने शिताफीने कंटेनर ची चावी काढून घेतली.

पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण,संदीप कारंडे, ललित चक्रनारायण यांना अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

पोलीसांनी श्रीराम बाबूराव सांगळे रा.दत्तनगर,पाटस ता.दौंड जि.पुणे या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असे मिळालेल्या माहितीवरून समजले.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर जि‌.पुणे)

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement