एस टी वर दगडफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक
Raju Tapal
December 13, 2021
36
एस टी वर दगडफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक
आंधळगाव ,ता शिरुर येथे एस .टी बस वर दगडफेक करून बसचालकाच्या समोरील काच फोडल्याप्रकरणी शिरूर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे.
भरत तानाजी माने वय - ३५ रा.न्हावरे ता. शिरूर जि. पुणे , अमर तुकाराम ठुबे वय - ३० रा.अण्णापूर ता.शिरूर जि.पुणे व योगेश अशोक सोनवणे वय- ३४ रा.राळेगण थेरपाळ ता.पारनेर जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार दौड आगाराची एस टी बस ११ डिसेंबर रोजी शिरुर बसस्थानकातुन शिरुर चौफुला या ठिकाणी जाण्यासाठी निघाली असता शिरूर तालुक्यातील न्हावरा गावा पुढील आंधळगाव फाट्याजवळ मोटारसायकल वरुन आलेल्यांनी एस टी बस वर दगडफेक केली त्यात एस टी च्या चालका समोरील काच फुटली .या घटनेबाबत टिटवाळा न्यूजने रविवार दि.१२/१२/२०२१ रोजी वृत्त प्रसारित केले होते.
याबाबत भैरवनाथ दळवी रा. शेटफळ गढे यांनी फिर्याद दिली . अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
Share This