• Total Visitor ( 495778 )
News photo

संघर्ष,सेवा आणि सन्मान!चऱ्होली बुद्रुकच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका 

Raju Tapal publisher April 25, 2026 54

संघर्ष,सेवा आणि सन्मान!चऱ्होली बुद्रुकच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका 



 रवींद्र येळवंडे (आप्पा) यांना 'मानद डॉक्टरेट' प्रदान

        

शिरूर:- जिद्द असेल तर आभाळही ठेंगणे असते याचा प्रत्यय चऱ्होली बुद्रुकचे सुपुत्र आणि थोर समाजसेवक रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे (आप्पा) यांनी दिला आहे. चऱ्होली बुद्रुकच्या मातीतून सुरू झालेला त्यांचा संघर्षाचा प्रवास आज सातासमुद्रापार पोहोचला असून,अमेरिकेतील प्रतिष्ठित "लुसियाना युनिव्हर्सिटी यांनी त्यांना "ऑनररी डॉक्टरेट' (मानद विद्यावाचस्पती) पदवी देऊन गौरविले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. संघर्षातून घडलेले व्यक्तीमत्व आप्पांचा बालपणाचा काळ अत्यंत खडतर होता. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती बेताची होती. चऱ्होली बुद्रुकते आळंदी असा प्रवास ते कित्येकदा रणरणत्या उन्हात आणि पावसाची पर्वा न करता अनवाणी पायाने करायचे. दुर्दैवाने आर्थिक ओढताणीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले,मात्र त्यांनी हार मानली नाही. शेतीतील कष्ट ते रिअल इस्टेट मधील भरारी शिक्षण सुटल्यावर त्यांनी मातीशी नाते जोडले. मांजरी येथील दारा इराणी यांची शेती कसण्यासाठी ते दररोज २०-३० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करायचे. शेतातील काबाडकष्ट आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुढे रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवले.आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० फ्लॅटचे भव्य प्रकल्प साकार होत आहेत.मात्र केवळ व्यावसायिक नफा न पाहाता ग्रामीण भागातील लोकांसाठी  अत्याधुनिक आणि स्वस्त उपचार देणारे 'मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल' उभारण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या उदात्त विचारांची साक्ष देते.

आध्यात्मिक वारसा आणि सामाजिक एकता आप्पा हे शंकराचार्य स्वागत समितीचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्षआहेत. जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य असोत किंवा वैष्णोदेवीचे महाराज,अनेक महान संतांचे त्यांच्या घरी वास्तव्य झाले आहे. केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक एकात्मतेसाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. शिक्षक दिनी ७० हून अधिक शिक्षकांचा गौरव असो किंवा मुस्लिम बांधवांच्या शाळेत 'भगवद् गीतेचे' वाटप करून माणुसकीचा संदेश देणे असो,आप्पांनी नेहमीच जातीपातीच्या पलीकडे जाऊन कार्य केले आहे.

वारी आणि अन्नदानाची अखंड परंपरा आषाढी-कार्तिकी वारी असो किंवा इंद्रायणी तीरावरील छटपूजा,वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी आप्पांचे मंडळ सदैव तत्पर असते. दर्शन बारीतील वारकऱ्यांना फराळ, चहा आणि औषधोपचार पुरवण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहेत. दिघी पोलीस स्टेशन येथे ३०० हून अधिक महिलांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा करून त्यांनी महिला सक्षमीकरणाचा वसाही जपला आहे. आप्पांचा प्रवास हा च-होली बुद्रुक च्या‌ मातीतून सुरू होवून आज समाजसेवेच्या एका उंच शिखरापर्यंत पोहोचला आहे.अनवानी पायाने शाळेत जाणा-या एका मुलाने स्वत:च्या‌ मेहनतीने ५०० कुटूंबाची घरे उभारण्यापर्यंत आणि हजारो लोकांची भूक भागवण्यापर्यंत मारलेली ही झेप आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विजय ज्ञानेश्वर चव्हाण (प्रभारी मुख्याध्यापक 

रवींद्र येळवंडे यांना मिळालेली ही डॉक्टरेट म्हणजे त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या नि;स्वार्थ सेवेची आणि घामाची पोचपावती आहे. या जागतिक सन्मानामुळे आळंदी आणि चऱ्होली बुद्रुक परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement