नांदकर शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
माध्यमिक विद्यालय नांदकर या शाळेत दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मनोज प्रकाश पाटील माजी उपसरपंच यांच्या संकल्पनेतून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाशजी पाटील आमदार शांताराम मोरे इद्रपाल तरे शिवसेना तालुकाप्रमुख कृष्णा वाकडे माजी जिल्हा परिषद सदस्य फशीताई पाटील शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रमोद जाधव ठाणे जिल्हा ओ बि सी संघर्ष समिती सरचिटणीस भावना ढमणे शिवसेना महिला आघाडी तालुका सचिव सुभाष भामरे, दशरथ पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास जाधव माजी सरपंच निलेश कोळी,सुरज खंडागळे, रोशन पाटील, विकास भोईर, विजय घरत,संकेत घरत, विजय थेटे, वैभव थेटे, अनिकेत दळवी,अविनाश घरत,जयवंत घरत, बबलु जाधव,अभय चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.