सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांची 109 वी जयंती त्रिरश्मी बौद्ध लेणी स्तूप विकास संस्था व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्यभूमी चे शिल्पकार व बौद्धाचार्य यांचे जनक भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांची एकशे नववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजता त्रिरश्मी बुद्ध लेणी स्तूप या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांच्या उपस्थितीत जयंती निमित्त प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष व स्तूप विकास संस्था चे उपाध्यक्ष अरुण शेजवळ व शैलाताई उघडे यांच्या हस्ते बुद्ध रूपाचे पुष्प व दिप पुजा करून भंते धम्म राखीत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच मंदाकिनी ताई दानी यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण केला
यानंतर भंन्ते धम्म रखित यांनी त्रिशरण पंचशील व भीम स्तुती वंदना घेतली
कार्यक्रमास उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच अध्यक्ष प्रतिभाताई तायडे यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षाच्या आठवणी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या व जयंतीनिमित्त अभिवादन केले तसेच चैत्यभूमी व भारतीय बौद्ध महासभा या संस्थे करता अहोरात्र व संपूर्ण भारतभर बौद्ध धम्म उपचाराकरिता भैय्यासाहेबांनी अतोनात परिश्रम घेतले असे मंदाकिनी ताई दाणी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी भंन्ते धमरखित यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा जीवन पटावर प्रकाश झोत टाकली
जयंतीनिमित्त जयश्रीताई शेजवळ यांनी बुद्ध स्तुप या ठिकाणी बौद्ध साहित्य पुस्तके विक्री चा स्टॉल लावण्यात आला होता .
कार्यक्रमास उपस्थिती
डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व बुद्ध लेणी आणि स्तुप विकास संस्था चे पदाधिकारी
आयु अरुण शेजवळ
आयु मंदाकिनीताई दाणी
आयु शैलाताई उघडे
आयु राज्यश्री शेजवळ
आयु प्रतिभा तायडे
आयु शीला पाटील
आयु वैशाली जाधव
आयु लक्ष्मी वानखेडे
कु .रुपाली उन्हवणे
धम्मा उपासक-उपासिका व बौद्ध बांधव धम्मप्रचार प्रसारक आदी उपस्थित होते.