लहुजी नगर येथील किन्नर अश्रू उर्फ बालूचा संशयास्पद मृत्यू
आईने व्यक्त केली घातपाताची शक्यता
गरीब महिलेला न्याय मिळवून देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
कल्याण :- लहुजी नगर येथे राहणाऱ्या अश्रू उर्फ बालू या किन्नराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय आईने व्यक्त केला असून, पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
अश्रू उर्फ बालू या किन्नराचा लहुजी नगर मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या जवळ खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संसयास्पद मृत्यू झाला होता.
आईचा आरोप – मुलाचा घातपात झाला असावा
अश्रूचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून विशेषतः त्याच्या कानातून रक्तस्राव होत असल्याने आणि गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्याने हा घातपात असू शकतो, असा संशय आईने व्यक्त केला आहे. अश्रूच्या आईचा आरोप आहे की, त्याला गळा आवळून फाशी दिली असावी. त्यामुळे हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचा तिचा दावा आहे.
पोलिस तपास आणि पुढील कारवाईची मागणी
याबाबत खडकपाडा पोलिसांनी तपास करून अश्रू उर्फ बालू चा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला असून
अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
माझ्या मुलाचा मृत्यू जर हृदयविकाराने झाला यावर माझा विश्वास नसून त्याला या अगोदर हृदयाचा आजार असल्याचे कधीही जाणवले नाही त्याला कोणताही आजार नव्हता छातीत दुखायला लागल्यानंतर तो घरी आला असता तो रेल्वे ट्रॅककडे कशाला जाईल अशी शंका आईने व्यक्त केली आहे कोणत्याही प्रकारची
घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला असला, तरी या प्रकरणात सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे
या प्रकरणात अधिक सखोल चौकशी होणे आवश्यक आहे तसेच या गरीब महिलेस पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा असे मत वंचित बहुजन आघाडी मोहने शहर महिला अध्यक्ष कल्पना पायाळ यांनी मागणी केली आहे.
या घटनेमुळे लहुजी नगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकही या प्रकरणाचा तपास तातडीने व्हावा, अशी मागणी करत आहेत. पोलिसांकडून यावर लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल, अशी अपेक्षा नातेवाईक व रहिवाशी करीत आहे