• Total Visitor ( 133515 )

स्वच्छता मोहीम राबवून गावकऱ्यांनी दिला अनोखा संदेश

Raju Tapal December 28, 2022 44

डोंगरगाव येथे स्वछता मोहीम राबवून गावकऱ्यांनी दिला एक अनोखा संदेश......गाव स्वच्छ तर मन स्वच्छ.... गाव स्वच्छ तर रोगराई मुक्त ...या हिवरे बाजार,पाटोदा या गावांचा वसा घेऊन डोंगरगाव येथील ग्रामस्थ,नवतरुण व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य मंडळींनी खंडोबा यात्रे निमित्तानं समाजसेवक हरीभाउ आण्णा उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्वच्छता आभियानाने विकासाच्या परीवर्तनाने सुरुवात केली. यावेळी लोकनियुक्त सरपंच दशरथ माधव उगले,उपसरपंच अमोल उगले,सोसायटीचे चेअरमन कोंडाजी उगले,मेजर दत्ता उगले,मेजर संदीप उगले,मेजर रामेश्वर उगले,शरदराव उगले, भाउराव क्षिरसागर,सुभाष पोपेरे,अविनाश चिकणे, प्रतिक उगले,राहुल उगले ,हर्षल उगले,ज्ञानेश्वर उगले,योगेश उगले,रोहीत उगले,निखील सरोदे,प्रमोद सरोदे,निलेश पानसरे,शुभम उगले,अशुतोष उगले,ज्ञानेश्वर उगले,देवराम कर्पे मामा,भाउसाहेब उगले,संजय कदम,पिके सर,मोहन उगले,रवी घुले,सावळेराम गायकवाड,अमोल उगले,ज्ञानेश्वर उगले आदी असंख्य सामाजिक कार्यकर्ते एक होत ध्यास गावच्या विकासाचे स्वन्प पहात प्रगतीपथावर गाव नेण्याची भावना व तळमळीने काम करून सुंदर डोंगरगाव करण्यासाठी सज्ज झाले होते. या स्वछते मोहिमेमुळे  कार्यकर्त्यांच्यां चेहऱ्यावरती एक प्रकारची सुखद लाट जाणवत होती. यावेळी अनेकांनी आपली गाव व स्वछते विषयी असलेली तळमळ व्यक्त केली.

 

Share This

titwala-news

Advertisement