• Total Visitor ( 133699 )

स्वमदत” या पुस्तकाचे जिल्हा न्यायाधीश यांचे हस्ते प्रकाशन

Raju Tapal May 04, 2022 54

पुणे येथील जिल्हा न्यायालयात“स्वमदत” या पुस्तकाचे जिल्हा न्यायाधीश यांचे हस्ते प्रकाशन तसेच “जिल्हा सत्र न्यायालय विशाखा समिती” या फलकाचे अनावरण करण्यात आले.. . . !

पुणे येथील न्यायालयात दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी अशोका हॉल येथे पुणे बार असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय संजय देशमुख साहेब तसेच पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री पांडुरंग थोरवे (व संपूर्ण बार असोसिएशन कार्यकारणी) यांचे हस्ते “स्वमदत” या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
  स्वमदत म्हणजेच- स्वतःच करा स्वताची मदत या उपक्रमांतर्गत या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल.फौंडर मेंबर्स एडवोकेट पियाली घोष( फाउंडर व पब्लिशर) तसेच एडवोकेट अनिषा फणसळकर यांचे कल्पनेमधून समाजातील विविध स्तरातील स्त्री-पुरुष व बालके यांना कायद्याचे व समुपदेशनाचे कामी मदत व्हावी तसेच समाजातील सामान्य व्यक्तींना व नव्याने येऊ घातलेल्या वकील व समुपदेशक यांस कायदा सोप्या भाषेत समजावा यासाठी हा प्रयत्न . सदरील पुस्तकामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय प्रताप सावंत सर , ज्येष्ठ वकील माननीय ऍड .श्रीकांत दळवी सर, पिंपरी चिंचवड येथील सायबर सेल पोलीस इन्स्पेक्टर माननीय डॉक्टर संजय तुंगार सर, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट सतीश मुळीक सर तसेच स्व-मदत प्रकाशक एडवोकेट पियाली घोष व फाउंडर मेंबर एडवोकेट अनिषा फणसळकर यांनी अत्यंत उपयुक्त अशा विषयांवर सदर पुस्तकात माहिती दिली आहे .
   सदर पुस्तक प्रकाशनावेळी माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री संजय देशमुख सर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट पांडुरंग थोरवे सर, जिल्हा न्यायाधीश एम एम देशपांडे, उपाध्यक्ष अडवोकेट विवेक भरगुडे, बार असोसिएशनचे इतर सर्व पदाधिकारी, विशाखा समितीच्या अध्यक्ष एडवोकेट शारदा वाडेकर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील एन डी पाटील सर, माजी सरकारी वकील एडवोकेट नीलिमा वर्तक, इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते.
सदर पुस्तकाचे प्रकाशनावेळी मोठा वकील वर्ग प्रत्यक्ष सोहळ्यास उपस्थित होता. सदर पुस्तकाचे कौतुक माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश सर, तसेच अन्य मान्यवरांनी केले.
माननीय जिल्हा न्यायाधीश देशपांडे मॅडम यांनी प्रत्येक स्त्रीने तर कोणाकडूनही मदतीची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतः स्वतःची मदत केली पाहिजे हे आवर्जून सांगितले.
सदर पुस्तक हे केवळ कायदेतज्ञांसाठी नसून सामान्य माणसाला कायदेशीर अडचण येऊच नये यासाठी कटिबद्ध राहून लिहिण्यात आले आहे .
     सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट प्रथमेश भोईटे यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट प्रितेश पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास वकील वर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Share This

titwala-news

Advertisement