आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा ,राज्य सरकारी कर्मचा-यांमध्ये विलिनीकरण करा या मागणीसाठी स्वारगेट,शिवाजीनगर,पुणे स्टेशन येथील एस टी बसस्थानकांमध्ये कर्मचा-यांनी संप पुकारून जोरदार निदर्शने केली.
एस टी बसस्थानकात पोहोचल्यावर प्रवाशांना एस टी संप असल्याचे समजत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होवून मोठी गैरसोय होत आहे.
प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी पुणे विभागातील एस टी कर्मचा-यांनी रविवारी दि.७ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून पुणे विभाग बंदची घोषणा केली.
त्यानुसार रात्री १२ नंतर पुणे विभागातील १३ डेपो बंद झाले. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
संपाबाबत माहिती नसल्याने अनेक प्रवासी स्वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडी स्थानकांत येवून माघारी परतत आहेत.
स्वारगेट स्थानकात बाहेरून येणा-या, स्वारगेट स्थानकातून बाहेर जाणा-या सर्वच्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
स्वारगेट डेपोतील गाड्या एका जागेवर उभ्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
स्वारगेट स्थानकातील आणि डेपोतील एस टी च्या कर्मचा-यांकडून स्वारगेट स्थानकात जमून जोरदार निदर्शने केली जात आहेत.