तळावली येथे 9 जनावरांना विषबाधा
टोकावडे पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या खेडले तळावली येथे 9 जनावरांना विष बाधा होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र सदरील घटना ही चाऱ्यामध्ये विष टाकून जाणून बुजून केली असल्याचा संशय निर्माण झालेला आहे.
खेडले तळावली येथील भास्कर यशवंत खापरे यांचा जनावरे बांधण्याचा गोठा हा गावा पासून दूर अंतरावर आहे. येथे कोणीतरी अज्ञात व्यकतीने चाऱ्या मध्ये विष टाकले असल्याचे बोलले जात आहे ही घटना निवडणुकीच्या वादातून झाली आहे असे बोलले जात आहे. याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ज्या कोणी हे कृत्य केले त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.