तळेगाव दाभाडे येथे १७ वर्षीय तरूणाचा खून
अज्ञातांनी गोळ्या झाडून १७ वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे गुरूवार दि.२३ /१२/२०२१ रोजी मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ घडली.
दशांत अनिल परदेशी वय -१७ रा.तळेगाव दाभाडे असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून त्याचे वडील अनिल परदेशी यांनी या घटनेची फिर्याद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली.
तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी कंपनीजवळ मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी होवून दशांतचा मृत्यू झाला.
रात्री साडेबारा वाजता पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविला
अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.