तळेगाव ढमढेरे गावच्या पाणीपुरवठ्यासाठी १३ कोटी ४ लाख २४ हजार रूपये निधी मंजूर
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावच्या पाणीपुरवठ्यासाठी १३ कोटी ४ लाख २४ हजार रूपये निधी मंजूर झाला आहे
शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी म़ंजूर झाला आहे असे समजते.
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील नागरिक, ग्रामस्थांना पाणी समस्येने ग्रासले होते .गेल्या अनेक वर्षांपासून खंडीत होणारा नित्याचा नळपाणीपुरवठा हा प्रश्न गंभीर बनला होता. ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना,ग्रामस्थांना, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असते.
नळपाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग पुणे यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. तसेच सदस्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी उपसमितीच्या दि.१०/०१ /२०२२ रोजीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे.