तळेगाव ते कुडाची वाडी रस्त्याची चाळण
गावकरी आलेत मेटाकुटीला
कुडाची वाडी ते तळेगाव रस्त्याची दुरवस्था झालेली असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत गावकरी संतप्त झाले आहेत. येथील पुलाला कठडे नसल्याने अनेक वेळा येथे अपघात झालेले आहे.
गेल्या 20 वर्षा पासून कुडाची वाडी हा रस्ता उखडून गेला असून अजूनही या रस्त्या बाबत कोणताही लोक प्रतिनिधी मनावर घेत नसल्याने दिवाळी पर्यंत हा रस्ता जर तयार झाले नाही तर गावात एकही लोक प्रतिनिधीना फिरकू देणार नाही असे येथील ग्रामस्थ राजा शिद,कैलास शिगवा,शंकर दरोडा,अशोक दरोडा,रघूनाथ दरोडा यांनी सांगितले.