टँकरचालकाने जोरदार धडक दिल्याने बाईक राईडर शुभांगी पवार यांचा मृत्यू
----------------
टँकरचालकाने जोरदार धडक दिल्याने सातारा येथील हिरकणी बाईक रायडर शुभांगी पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला रायडर्स १ हजार ८६८ किलोमीटर प्रवासासाठी मोटरसायकलने नवरात्रौत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेवून त्या तुळजापूर येथे पोहचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकरफाटा दाभड येथे टँकरचालकाने जोरदार धडक दिल्याने हिरकणी बाईक रायडर्स ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार वय -३२ यांचा जागेवरच मृत्यू झाला.
टँकर क्रमांक जी जे १२ ए टी ६९५७ हा अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.