• Total Visitor ( 84730 )

तरकारीची वाहतूक करणा-या पिक अपची टेम्पोला धडक;

Raju tapal October 10, 2021 32

तरकारीची वाहतूक करणा-या पिक अपची टेम्पोला धडक ; एक जण मृत्यूमुखी ;पाटस टोलनाक्याजवळ अपघात

              ------------------

कुरकुंभहून पुण्याच्या दिशेला भरधाव वेगात जात असलेल्या तरकारीची वाहतूक करणाऱ्या पिकअपने रस्त्यालगत उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप मधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला.

सतिश आत्माराम शिंगटे वय ३३ रा.गलांडवाडी , इंदापूर जि.पुणे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पिक अपमधील क्लिनरचे नाव आहे.

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोलनाक्यापासून काही अंतरावर शनिवारी दि.९/१०/२०२१ रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात  झाला.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत टोलनाक्यापासून काही अंतरावर टेम्पो क्रमांक एम एच ११ ए एल १९५२ टायर गरम झाल्माने महामार्गालगत उभा होता. त्यावेळी सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या तरकारी मालवाहतूक करणा-या एम एच ४२ ए क्यू ६१८३ महिंद्रा पिकअपने  महामार्गालगत उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली.

या अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक अपघातात गंभीर जखमी झाला असून जखमी झालेल्या वाहनचालकाची ओळख पटू शकली नाही. 

टेम्पोचालक हनुमंत तानाजी साळूंके वय -३२ रा.मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूर यांनी अपघाताची फिर्याद यवत पोलीस स्टेशनला दिली.

Share This

titwala-news

Advertisement