तरूणांनी फुले शाहू आंबेडकर विचारांच्या चळवळीत झोकून काम करावे
Raju Tapal
October 23, 2021
77
तरूणांनी फुले शाहू आंबेडकर विचारांच्या चळवळीत झोकून काम करावे - श्यामदादा गायकवाड.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर शाखा शिवळे मुरबाड च्या वतीने नामफलकाचे उद्धाटन संस्थापक अध्यक्ष रिपब्लिकन लढावू नेते श्यामदादा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी जमलेल्या समूहाला संबोधित करताना "शिवळे गांव व परिसरातील लोक हे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे असल्याने गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्षासोबत अन्य लोकांना जोडण्याचे काम ते करत असतात. या वेळी रवींद्र चंदने ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी विचार व्यक्त करताना ज्या तरुणांना आपले तारूण्य समाजांच्या शोषित, पीडित,वंचित, घटकांच्या सामाजिक उन्नतीसाठी जाळून घेयाचे आहे त्यांनीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर मध्ये प्रवेश करावा. येथे कोणावर तरी अर्ज टाकून पैसे कमावता येत नाही किंवा पक्ष म्हणजे आर्थिक प्रगती करण्याचे साधन नाही. आम्ही सतत काम करत असताना कोठे चुकतो तर" दादा "काय बोलतील ही भीती असते व चांगले काम केल्यावर दादाच्या कौतुकाची थाप ही असते. या पक्षात जात, धर्म,लिंग, भाषा, प्रांत किंवा कोणताही भेद केला जात नाही, जे अन्यायग्रस्त आहेत ते आपले आणि अन्याय करणारा मग तो कोणी ही असो त्याला सोडायचे नाही ही भूमिका असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हरेंद्र सोष्टे यांनी केले. त्यांनी आदरणीय श्यामदादा गायकवाड यांनी 1974 साली लिहिलेली कवितेच्या ओळी ऐकवल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण खोळंबे यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष- श्यामदादा गायकवाड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ.अरविंद उबाळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदणे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धनगर, तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोलांबे, युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, ग्रामपंचायत शिवले सरपंच निलिमा जाधव, उपसरपंच नरेश इसामे, विद्यार्थी संघटना जिल्हा संघटक निखिल अहिरे, तालुका सरचिटणीस किशोर गायकवाड, जयराम अहिरे , शरद थोरात , महेश जाधव, सचिन धनगर , दीपक भवार, जगदीश साटपे, रवी गायकवाड , अक्षय रोकडे, कुमार थोरात , आदी कार्यकर्ते ,पदाधिकारी , महिला , विद्यार्थी, ग्रामस्थ, व सिद्धार्थ मित्र मंडळ शिवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Share This