प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक,शिक्षकेतर संघटनांचा पुण्यात मोर्चा
शिरूर (प्रतिनिधी):- टी ई टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी,शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचा-यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी शाळा बंद ठेवून पुणे जिल्ह्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शुक्रवारी दि.५ डिसेंबरला मोर्चा काढला. शिक्षकांवर अतिरिक्त भार नसावा,२०१३ आधीच्या शिक्षकांना टी ई टी ची अट नसावी,टी ई टी रद्द झाली पाहिजे,कंत्राटी शिक्षक भरती न करता पूर्णवेळ शिक्षक नेमावेत,शिक्षणामध्ये कंत्राटीकरण करणे थांबवावे, शिक्षकेतर कर्मचा-यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी,शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी,आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे अशा मागण्या यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना नेत्यांनी यावेळी केल्या.