तेजस सरवदे यांचे उपोषण मागे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [आठवले] ठाणे ग्रामीण अंबरनाथ शहर शाखेचे संपर्क प्रमुख तेजस प्रमेश सरवदे .शहर अध्यक्ष दिपक धनवडे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसापासून आमरण उपोषण साठी अंबरनाथ तहसिलदार कार्यालया जवळ बसले होते. या उपोषणा ठिकाणी शहर अध्यक्ष दिपक धनवडे व अंबरनाथ शहर कार्यकारिणी यांचे सोबत ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे.ठाणे ग्रामिण जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, माजी नगरसेवक महादेव रायबोले, महाराष्ट्र राज्या सहसचिव राहुल हंडोरे,ठाणे प्रदेश कमलाकर सुर्यवंशी, महिला आघाडी आशाताई सोनावणे,मिना नगराळे,गौतम ढोके,सिमा महाजन, मिना बाविस्कर, काकडे,बाळासाहेब खंडागळे, उबाळे,दिलीप जाधव इत्यादींशी प्राथमिक चर्चा करण्यात येवून प्रशासक गायकवाड अंबरनाथ नगरपरिषद यांचे दालनात सकारात्मक चर्चा होवून मार्ग काढून लेखी आश्वासन पञ घेऊन उपोषण ठिकाणी अंबरनाथ नगरपरिषद चे प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत पुढील घटनात्मक बाबीची पूर्तता होणेच्या अटी शर्थी च्या अधिन राहून आज रोजी तेजस सरवदे यांनी तात्पुरते उपोषण सर्व पदाधिकारी व प्रशासन अधिकारी यांचे समवेत मागे घेण्यात आले.