तेजस्विनी फाऊंडेशन अंतर्गत शिरूर शहरात तेजस्विनी समुपदेशन केंद्र सुरू
शिरुर शहरात तेजस्विनी फाऊंडेशन अंतर्गत तेजस्विनी समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे .
बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या व समुपदेशिका सत्यभामा सौदरमल यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना पाचंगे , महाराष्ट्र फाऊंडेशन च्या पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले , तर्डोबावाडीच्या माजी सरपंच वर्षा काळे ,माजी सरपंच जिजाउबाई दुर्गे , वात्सल्यसिंधु फाऊंडेशनच्या उषा वाखारे ,मुख्याध्यापिका स्वाती थोरात ,आदी उपस्थित होत्या.
सत्यभामा सौदरकर यांनी समुपदेशन केंद्राद्वारे समस्यांचे निराकारण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले .
घरातील स्त्रीच्या कामाचे महत्व समजावून घ्या असे आवाहन त्यानी केले . स्त्रीकडे माणूस म्हणून पाहिल्यास खूप सारे प्रश्न सुटु शकतील असे त्या म्हणाल्या .मुलांना घडविण्यामध्ये आई वडिल दोघे ही महत्वाचे असतात . दारुच्या व्यसनामुळे कुटुंबात वाद होतात . सामाजिक कार्य करत असताना सोशल मिडियाच्या जसे फेसबुक ,रील ,यु ट्युब इनन्स्टाग्राम याचा वापर करावा .वेगवेगळी माहिती सोशल मिडिया द्वारे महिला पर्यंत पोहोचवत आहे . खंबीर भूमिका घ्या, इतरांशी संवाद साधा, असे ही त्या म्हणाल्या .
सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भोसले , शोभना पाचंगे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले .
समुपदेशन केंद्राच्या प्रमुख व तेजस्विनी फाऊंडेशनच्या वैशाली चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, किशोरवयीन विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन, वैयक्तिक व कौटुंबिक समस्यांसाठी, ताण तणाव ,एकटेपणा , नैराश्य ,विसंवाद , भावनिक वर्तन समस्या इत्यादीवर समुपदेशन केंद्रातून समुपदेशन करण्यात येणार आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पारधी यांनी केले . वर्षा काळे यांनी आभार मानले .