• Total Visitor ( 369804 )

टेंभुर्णी शिवारातील शेतातून ७ लाख रूपये किंमतीची ९७ किलो गांजाची झाडे जप्त

Raju tapal October 02, 2021 68

वसमत तालुक्यातील टेंभुर्णी शिवारातील शेतातून ७ लाख रूपये किंमतीची ९७ किलो गांजाची   झाडे जप्त करण्याची कारवाई हट्टा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी शुक्रवारी दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी केली.



याप्रकरणी रावसाहेब रसवंडकर या शेतक-याला हट्टा पोलीसांनी ताब्यात घेतले.



वसमत तालुक्यातील टेंभुर्णी शिवारात एका शेतात पपईच्या झाडांंमध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय , हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन सरोदे, जमादार गजभार, सोनटक्के, राजू ठाकूर,विजय घुगे या  पथकाने शुक्रवारी १ ऑक्टोबरला  सायंकाळच्या सुमारास सवंडकर यांच्या शेतात छापा टाकला. पपईच्या झाडांमध्ये गांजा लावल्याचे पोलीसांना आढळून आले.



सदर झाडे सुमारे सहा फुटांपक्षा उंच असून पोलीसांनी केलेल्या मोजणीमध्ये सदरील झाडांची संख्या ३२ असून त्याचे वजन ९७ किलो असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.



या गांजाच्या झाडा़ंची किंमत सुमारे ७ लाख रूपये असून पोलीसांनी सर्व झाडे उपटून जप्त केली.



याप्रकरणी रावसाहेब सवंडकर या शेतक-याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे तपास करत आहेत.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement