कुडाळ पोलीस ठाण्याचे रूप पालटणार...
तीन अधिकारी निवासस्थाने आणि ४१ कर्मचारी निवासस्थाने मंजूर
तर १९१७ मध्ये ब्रिटिश राजवटीत बांधलेली आताची मुख्य कुडाळ पोलीस ठाण्याची ही इमारत होणार दुमजली
कुडाळ :- कुडाळ पोलीस ठाण्याचे रूप आता लवकरच पालटणार आहे. सुसज्ज अशी दोन मजली इमारत आणि कर्मचाऱ्यांसाठी ४१ निवासस्थाने या कामाला मंजुरी मिळाली असून येत्या तीन महिन्यात हे काम सुरू होणार असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. यासाठीपोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
कुडाळ पोलीस ठाण्याची इमारत हि ब्रिटिशकालीन आहे. १९१७ मध्ये हि इमारत बांधण्यात आली. कुडाळ पोलीस ठाण्याचा हा परिसर एकूण तीन एकर जागेत आहे. सध्या येथील इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्याच्या तीन अधिकारी निवासस्थाने आणि ४१ कर्मचारी निवासस्थानाच्या कामाला मंत्रालय पातळीवर मंजुरी मिळाली असून येत्या तीन महिन्यात हे काम सुरू होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कुडा पोलीस ठाणे परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सध्या ज्या ठिकाणी पोलीस ठाण्याची इमारत आहे त्याच्या समोर ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी पोलीस ठाण्याची मुख्य इमारत होणार आहे. ही इमारत दुमजली होणार आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी तळमजला प्लस चार मजल्याची इमारत होणार आहे.या इमारतीत एकेचाळीस निवासस्थानी असतील तर अधिकाऱ्यांसह स्वतंत्र तीन निवासस्थानी असतील अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
कुडाळ पोलीस स्टेशन आवर तीन एकर जागेत पसरला आहे. पोलीस स्टेशनची इमारत डागडुजीसाठी आली आहे तर निवासस्थाने सुद्धा मोडकळीस आल्यानं ती बंद अवस्थेत आहेत. आर आर पाटील गृहमंत्री असताना पोलीस स्टेशन व निवासस्थानाबाबत सर्वे झाला होता.मात्र निधीची तरतूद न झाल्याने काम जैसे थे होते. कुडाळ पोलीस स्टेशन सध्याच्या इमारतीत आहे ती इमारत १९१७ मध्ये ब्रिटिश राजवटीत बांधलेली आहे. या इमारतीची डागडुजी करून ती वापरली जात होती. मात्र आता पावसाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना इमारतीमध्ये बसताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते, याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेऊन गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. मंत्रालय पातळीवर या कामाला मंजुरी मिळाली असून इतर प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे. गृह विभागाच्या अधिकारी अर्चना त्यागी यांनी यात विशेष लक्ष घातला आहे.या परिसरात एक अधिकारी निवासस्थान असून ते ब्रिटिशकालीन आहे. खरेतर हे निवासस्थान जपण्याची आवश्यकता होती.निधी अभावी त्याची दुरुस्ती झाली नसल्याने ते पूर्णपणे मोडकळीस आले आहे. सध्या ३० कर्मचारी निवासस्थाने असून ती बंद अवस्थेत आहेत. दोन महिन्यापूर्वी या परिसराचा सर्वे झाला आणि उर्वरित प्रक्रियेने वेग घेतला आहे.
कुडाळ पोलीस स्थानकात सध्या अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्या मनाने निवासस्थाने अपुरी आहेत. सद्यस्थितीत सर्वच अधिकारी कर्मचारी भाड्याच्या निवास्थानात राहत आहेत. सध्या ज्या इमारतीत पोलीस स्टेशन आहे ती इमारत तशीच ठेवून या इमारतीचा वापर मुद्देमाल ठेवण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी २६ लाख निधी मंजूर झाला आहे. पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.