गुहागर; आज पासुन मराठा प्रिमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
शृंगारतळी :- क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना, गुहागर यांच्यावतीने मराठा प्रिमियर लीग पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धा आज शनिवार दि.१ व रविवार दि.२ मार्च रोजी शृंगारतळी येथील पाटपन्हाळे-शृंगारतळी येथील मैदान येथे आयोजित करण्यात आले आहेत.
क्षत्रिय ज्ञाती मराठा संघटना, गुहागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षत्रिय मराठा युवा संघटना, गुहागर ही मराठा समाजाच्या सर्व गावातील तरुणांना एकत्र करणे व क्षत्रिय मराठा भवन उभारणे हे उद्देश डोळयासमोर ठेऊन मराठा प्रिमियर लीग (पर्व तिसरे) चे आयोजन करीत आहे. मराठा प्रिमियर लीग ही केवळ क्रिकेटची स्पर्धा नसुन मराठ्यांचा महामेळा आहे. या मराठा प्रीमियर लीगच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील सर्वदुर पसरलेल्या मराठा समाज बांधवांना शनिवार दि. १ मार्च २०२५ ते रविवार दि. २ मार्च २०२५ या दोन दिवसात एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न आहे.
दि.१ मार्च रोजी सकाळी ८.३० वा. या स्पर्धेचा उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ५५ हजार ५५५ रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकास ३३ हजार ३३३ रुपये तसेच उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, मालिकावीर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवीण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेचा सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भगवान धोंडू कदम ,सचिव अमिष प्रभाकर कदम क्षत्रिय मराठा युवा संघटना, अध्यक्ष
गुहागर ऍड.संकेत साळवी सचिव निखिल साळवी यांनी केले आहे.