• Total Visitor ( 133849 )

अवैध स्थलांतरितांना घेऊन पहिले अमेरिकी विमान भारताकडे रवाना

Raju tapal February 05, 2025 56

अवैध स्थलांतरितांना घेऊन पहिले अमेरिकी विमान भारताकडे रवाना

नवी दिल्ली :- अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे. मेक्सिकोसारख्या शेजारी देशातील लोकांना अमेरिकेने विमानाने परत पाठविले होते. तिथे या विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, अखेर ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकन सरकारने या घुसखोरांना माघारी घेण्यास होकार दिला होता. अशाच प्रकारे मंगळवारी २०० भारतीय घुसखोरांना घेऊन अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान भारताकडे येण्यासाठी निघाले.

अमेरिकेत जे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. आज २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले आहे.

अमेरिकेचे सी-१७ हे विमान या अवैध लोकांना घेऊन निघाल्याचे एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना कळविले आहे. १८ हजार पेक्षा जास्त भारतीय लोक अमेरिकेत अवैधरित्या राहत आहेत. या लोकांचा व्हिसा संपला आहे किंवा ते अवैधरित्या अमेरिकेत दाखल झाले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, स्थलांतरितांना घेऊन एक सी-१७ विमान भारताकडे रवाना झाले आहे, असे वृत्तात म्हटले आहे.  अशा अनिवासी भारतीयांचे व्हिसाची मुदत संपली आहे किंवा ते बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाले आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार, दरवर्षी शेकडो लोक डंकी रूटद्वारे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. यातील काही लोक यशस्वी देखील होतात. टेक्सासमधील एल पासो आणि कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथून ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.
 

Share This

titwala-news

Advertisement