भारतीय संविधान हे प्रत्येक गावा गावात पोहचले पाहिजे ओबीसी नेते राजाराम पाटील
टिटवाळा:- भारतीय संविधान हे प्रत्येक गावा गावात ग्रामीण भागात पोहचले पाहिजे तरच संविधान म्हणून काय हे नागरिकांना समजेल व गावागावात होणारे वाद विवाद तसेच अंधश्रद्धा थांबेल असे प्रतिपादन ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी टिटवाळा येथील संविधान कार्यक्रमात मत व्यक्त केले आहे. 26 नोव्हेंबर हा सर्वत्र भारतीय संविधान गौरव दिन साजरा केला जातो. त्या प्रमाणे बौद्ध समाज समन्वय समिती मांडा टिटवाळा यांच्या वतीने 76 व्या भारतीय संविधान गौरव दिन महोत्सवाचे आयोजन टिटवाळा येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी सांगितले की समता स्वातंत्र्य बंधुता हे मुलभूत तत्वे संविधाना मध्ये आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही,संविधान दिन हा ओबीसी समाजाने मोठ्या उत्साहात साजरा करायला पाहिजे परंतु तसे दिसत नाही फक्त बौद्ध समाजच संविधान दिन साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधाना मुळे आज आम्ही बहुजन समाज ताट मानेने जगत आहे. सविधानाने आम्हाला अधिकारी दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील आमच्या जमीनी ह्या भांडवलशाहीच्या तांब्यात होत्या. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आमच्या जमीनी आम्हाला परत मिळाल्या. आगरी-कोळी समाजातील हि मुले शिक्षण घेऊन उच्च पदावर आहेत हि सर्व संविधानाची किमया आहे. आम्हाला हि संविधानातुन अधिकारी दिले आहेत. म्हणून आज प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचले पाहिजे. प्रामुख्याने ग्रामीण भागात प्रत्येक गावात संविधान वाजत गाजत मिरवणूक काढली पाहिजे. तसेच स्थानिक स्वराज्य निवडणूकी बाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की,खासदार,आमदार यांच्या निवडणुका आरक्षणाच्या नियमानुसार पार पडल्या,परंतु स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका मध्ये आरक्षण घोळ झाला. न्यायालयाने पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देवू नये असे असतानाही सरकारने सत्तर टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिले व शेवटी न्यायालयाने दखल घेतली निवडणूका घेता येणार नाही, सरकारला माहिती असतानाही जाणून बुजून आरक्षण वाढविले आहे. म्हणून सरकारची मानसिकता नाही निवडणूक घेण्याची असे मत व्यक्त केले. तसेच प्रा. डॉ राजन गोरे यांनी हि संविधान बाबत सखोल माहिती दिली.सभा अध्यक्ष विजय भोईर यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय तांबे यांनी केले तर सुत्रसंचालन सुरेश मुलीक तर आभार प्रदर्शन रिपाइंचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव यांनी केले. तसेच यावेळी शाहीरी जलसा संविधान जागर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.