• Total Visitor ( 481750 )
News photo

पिंगुळी देऊळवाडीतील स्मशानभूमीची चोरी

Raju tapal July 22, 2025 58

पिंगुळी देऊळवाडीतील स्मशानभूमीची चोरी



स्मशानभूमी शेड उभारणीस रेल्वे रूळांचा वापर, प्रकार उघडकीस येताच रातोरात स्मशानभूमी शेड गायब



पिंगुळी ग्रामपंचायतीचा कारभार संशयास्पद



सोशल मीडियावर फोटो बातमी झाली व्हायरल



कुडाळ :- पिंगुळी ग्रामपंचायत हद्दीतील देऊळवाडी स्मशानभूमी दुरुस्तीच्या स्ट्रक्चरल कामासाठी कोकण रेल्वेच्या जुन्या रुळाचा वापर करण्यात आला होता आणि सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले होते.याची पोलखोल होताच सदर साहित्य स्मशानभूमीतून गायब करण्यात आले. आता त्या जागेत फक्त स्मशान चौथराच राहीला आहे.



कालपरवा पर्यंत उभी असलेली स्मशानभूमीची शेड चोरी झाल्याचे स्पष्ट होत आहे. आता ही स्मशानभूमीची शेड गेली कुठे. ती कोणि चोरून नेली की कोणी गायब केली याचा प्रश्न तेथील ग्रामस्थांना पडला आहे. या संदर्भात देऊळवाडी ग्रमस्थांनी असे सांगितले आहे की या स्मशान भूमीसाठी कोकण रेल्वेच्या पटरीचे पोलाद सामान रूळांचा वापर करण्यात आला होता त्या मुळे ग्रामस्थानी कोकण रेल्वे अधिकारी यांना पत्र देऊन आपण साहित्य लिलावाने दिले होते का याबाबत चौकशी केली आहे. ही बाब उघडकीस आल्यावर स्मशानभूमीचे साहित्य रातोरात गायब झाले असून देऊळवाडी स्मशानभूमी चोरीस गेली आहे. असे ग्रामस्थांनी सांगितले.त्यामुळे हे स्पष्ट होत आहे की, जी स्मशानशेड ज्या ठेकेदाराने उभारली त्यास कोकण रेल्वेच्या पोलाद सामान चोरून आणले असावे म्हणूनच ते रातोरात गायब झाले आहे असे ग्रामस्थांनी  सांगितले आहे.या बाबतीत पिंगुळी ग्रामपंचायत नेमकी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण देऊळवाडी सहित पिंगुळी गावाचे लक्ष लागून राहिले आहे.



पिंगुळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या निकृष्ट कामाबाबत उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये पिंगुळी येथील सार्वजनिक स्मशान भूमी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून सदर स्मशिन भूमी स्ट्रक्चरसाठी कोकण रेल्वेकडून आजूबाजूला ठेवण्यात आलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.कोकण रेल्वेसाठी वापरण्यात येत असलेले रूळ या स्मशानभूमीसाठी वापरण्यात आले आहेत. तसेच इंजिनीयरला हाताशी धरून सदरचे साहित्य विकत आणल्याचे भासवून खोटे बिल काढण्यात आले आहे. सदरची स्मशानभूमी व त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि मेजरमेंट बुकवर नोंदविण्यात आलेली मापे आणि साहित्य याची पडताळणी करणे आवश्यक आहे.ग्रामपंचायत, पोट मक्तेदार आणि इंजिनियर यांनी संगनमताने कोकण रेल्वेचे साहित्य पळवून खोटे बिल मक्तेदाराच्या नावे काढले आहे. सदर प्रकरणाची वस्तुस्थिती पडताळून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement