• Total Visitor ( 133782 )

मोचेमाड स्मशानभूमीतील टॉवरच्या ४ लाख रुपये किमतीच्या साहित्याची चोरी

Raju tapal December 26, 2024 35

मोचेमाड स्मशानभूमीतील टॉवरच्या ४ लाख रुपये किमतीच्या साहित्याची चोरी

अज्ञात चोरट्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेंगुर्ले :-मोचेमाड येथील स्मशानभूमीत सध्या काम चालू असलेल्या टॉवरचे सुमारे चार लाख रुपयांचे साहित्य अज्ञाताने २४ डिसेंबर रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या पूर्वी चोरून नेल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिसात दाखल झाली असून अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोचेमाड ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक स्मशानभूमीत पेस डिजिटेक कंपनीच्या कोल्हापूर येथून टॉवरच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे रुपये ३ लाख ९३ हजर ८२३ रुपयांचे सामान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेले आहे. या संदर्भात वेंगुर्ले नवाबाग येथे राहणारे सांगली हिंगणगाव बुद्रुकचे मूळ रहिवासी धनाजी भिकू कदम याने वेंगुर्ले पोलिसात आज बुधवार २५ डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहिता ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल रूपा वेंगुर्लेकर या करीत आहेत.
 

Share This

titwala-news

Advertisement