• Total Visitor ( 651308 )
News photo

नोकरीचे आमिष दाखवून ७० लाखांची फसवणूक;तिघांना अटक

Raju Tapal publisher July 30, 2026 22

नोकरीचे आमिष दाखवून ७० लाखांची फसवणूक;तिघांना अटक





भिवंडी:-  महाराष्ट्र महसूल विभाग (मंत्रालय) येथे शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका नोकरी इच्छुकाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींना भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून बनावट शासकीय ओळखपत्रे,बनावट रबर स्टॅम्प तसेच बनावट लेटरहेड जप्त करण्यात आले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी सरकारी नोकरी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून,या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement