भीमाशंकर - मंचर रोडवर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- भीमाशंकर - मंचर रोडवर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला.
अथर्व संदीप खमसे,भरत वाजे, गणेश रामभाऊ असवले (तिघेही वय वर्षे -१९ तिघेही रा.कोळवाडी, घोडेगाव जि.पुणे) अशी अपघातातील मृतांची नावे असून घोडेगाव जवळील पळसटिका फाट्यावर मंगळवार दि.१५ जुलैला दुपारी हा अपघात झाला.
उत्तरप्रदेश,चित्रकूट येथील ५० प्रवासी लक्झरी बसमधून भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. दुचाकीवरील तिघेजण कामासाठी मंचर येथे निघाले होते.लक्झरी बस व दुचाकीचा पळसटिका येथे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे समजले.