• Total Visitor ( 84257 )

टिटवाळयात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण.... आईने व मावशीनेच वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले आरोपींमध्ये बिल्डर चा ही समावेश....

Raju tapal August 10, 2017 68

मांडा टिटवाळा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या व  तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात टिटवाळा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी मांडा टिटवाळ्यातील बांधकाम व्यावसायिक असून तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपहत मुलगी आपल्या आईसोबत टिटवाळा येथे राहते. तिच्या आईने स्वखुशीेने तिला शरीरविक्रीसाठी भाग पाडले. उल्हासनगर येथे राहत असलेला तृतीयपंथी सोनू हा ग्राहकांबरोबर संवाद साधून या मुलीला लॉजमध्ये घेऊन जात असे. पीडितेची आई मध्यंतरी क्षयरोगाने तर मावशी कोरोनामुळे मृत पावली असून या गुन्ह्यात दोघींचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोक्सो अंतर्गत नोंदवलेल्या या गुन्ह्यात सात आरोपी आहेत. संतोष वर्मा ( ४६, टिटवाळा) तसेच राधेश्याम जैस्वाल (३५, विक्रोळी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपीमध्ये मिस्त्री अंकल तसेच मांडा टिटवाळा येथील बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडितेच्या आई व डोंबिवली येथे राहत असणाऱ्या मावशीचा मृत्यू झाल्याने ही मुलगी स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आली. तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती कार्यकर्त्यांना दिली. विक्रोळीतील राधेश्याम जैस्वाल यांना पोलिसांनी अटक केले असून ठाण्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत कल्याण तालुका पोलिस ठाण्यातील महिला  पोलिस उपनिरीक्षक काजोल यादव यांनी अपहत मुलीची आई व मावशी वेश्या व्यवसायात अल्पवयीन मुलीला ढकलून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत टिटवाळा पोलिस ठाण्यात वेश्या व्यवसायात ढकल्या प्रकरणी cr.no. ४९१ कायदा कलम ३७६ बालकांचे लैंगिक अत्याचार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांचा मार्गद्शनाखाली महिला  पोलिस उपनिरीक्षक काजोल यादव या अधिकचा तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement