टिटवाळा मिस आणि मिसेस सिजन १ विजेता कोण होणार....?
सौदर्य स्पर्धेसाठी महिलांची झिम्माड गर्दी ..... !
टिटवाळ्यात येत्या ३० एप्रिल रोजी प्रथमच मिस आणि मिसेस सौन्दर्य स्पर्धेचे आयोजन स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. तीन गटांत आयोजन केलेल्या सौन्दर्य स्पर्धेसाठी टिटवाळा परिसरातील विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. यातील १६ ते २५ वयोगटातील स्पर्धेसाठी ८, तर २६ ते ४० वयोगटासाठी १५ तर ४० ते ६५ वयोगटातील महिलांसाठी ७ महिलांनी सहभाग नोंदवला असून अजून अनेक महिलांनी सहभाग मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. टिटवाळा मंदिर जवळील पाण्याच्या टाकीजवळ अशोका मॅरेज हॉल,साईबाबा मंदिराच्या समोरच सदरील कार्यक्रम पार पडणार असून टिटवाळकरांना या सौन्दर्य स्पर्धेची खूपच उत्सुकता लागलेली आहे.
या सौन्दर्य स्पर्धेसाठी ६ जजची निवड करण्यात आली असून त्यांची नावे गोपनीय ठेवलेली आहे. सदरील सौन्दर्य स्पर्धेसाठी नाम मात्र पन्नास रुपये हे शूळ प्रवेश फी म्हणून ठेवण्यात आलेली असून या मध्ये दोन जनानंच प्रवेश मिळणार आहे. तसेच यामध्ये चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर लहान मुलांसाठी वेगळी प्रवेशिका घ्यावी लागणार आहे.
सदरील सौन्दर्य स्पर्धेची उत्सुकता मोठ्या प्रमाणात टिटवाळकरांना लागून राहिलेली असून सहभागी होण्यासाठी सर्वच वयोगटातली महिला,मुलींनी आपली नवे नोंदवली आहेत. विशेष म्हणजे दीपाली दलाल या एका ६४ वर्षीय सौन्दर्य वतीने तर ६३ वर्षीय प्रवीण शेलम या महिलांनी यात स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे.
सायंकाळी ४ वाजता सुरु होणाऱ्या या सौन्दर्य स्पर्धेत महिलांच्या अंगीभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य हि ठेवण्यात आलेले आहे. सुरवातीला जिजाऊ वंदना,गणेश वंदना,शिव गर्जना व मुक्त व्यासपीठ असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. दोन फेऱ्यात पार पडणाऱ्या या सौन्दर्य स्पर्धेसाठी ट्रेडिशनल वेस्टर्न व वैचारिक राउंड ठेवण्यात आलेले आहे. ती वयोगटातील प्रथम व द्वितीय अश्या सहा जणींना या स्पर्धेत विजयी होण्याचा मान मिळणार असून १० महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सुप्रिया आचरेकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून चारुशीला मंचरकर,समृद्धी सावंत,भावना बनफ,उज्वला भोईर यांच्या समितीने उत्कृष्ट नियोजन केलेले आहे.
स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता टिटवाळा हि सांस्कृतिक शहर म्हणून नाव लौकिकास पात्र होईल यात तिळमात्र शंका नाही.