• Total Visitor ( 430222 )
News photo

टिटवाळा ओव्हर ब्रिजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिसी दद्वारे उदघाटन

Raju tapal May 14, 2025 133

टिटवाळा ओव्हर ब्रिजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिसी दद्वारे उदघाटन



टिटवाळा :- कल्याण टिटवाळा रोडला जोडणारा महत्त्वाचा ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथून व्हिसी द्वारे उदघाटन करण्यात आले.

त्या नंतर माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या हस्ते टिटवाळा येथे ब्रिज जवळ फित कापुन उदघाटन करण्यात आले.

टिटवाळा येथील ब्रिजच्या उदघाटन समयी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, भाजप जिल्हा अध्यक्ष कपिल पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, रेल्वे विभागाचे कुमार अनुराग, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव मनिषा केळकर, टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, मोहने मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील, महिला मंडळ अध्यक्षा सारीका पाटील, भाजप उद्योग आघाडीचे परेश गुजरे,अमोल केदार, संतोष शिंगोळे,वॉर्ड अध्यक्ष दिपक कांबळे, किरण रोठे यांच्या सह आदि उपस्थित होते.

एमएमआरडी,महारेल व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संपूर्ण राज्यात रेल्वे ब्रिज बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेल्वे ब्रिज बनविल्याने वाहतूक कोंडी कमी होते व नागरिकांना त्रास सहन करावा लागत नाही. त्याप्रमाणे

कल्याण कसारा मध्ये रेल्वेचे टिटवाळा रेल्वे स्थानिक आहे. रेल्वे स्टेशन लगतच रेल्वे फाटक होते. रेल्वे फाटका मुळे वाहतूक कोंडी होत होती, येथे उडडाण पुल असणे गरजेचे होते या बाबींचा विचार करून एमएमआरडी,महारेल व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कल्याण टिटवाळा मुख्य रस्त्याला जोडणारा रेल्वे ब्रिज मंजूर केला. 810 मीटर लांबी व 110 कोटी रुपये खर्च करण्यात आला. 

रेल्वे ब्रिज होणे आवश्यक होते यासाठी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी हि वारवांर रेल्वे विभाग, एमएमआरडी कडे पाठपुरावा केला होता. ब्रिज झाल्याने मांडा टिटवाळाकरांची वाहतूक कोंडीने सुटका झाली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement