• Total Visitor ( 84712 )

टिटवाळ्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन

Raju Tapal May 31, 2022 40

कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीत आज दि 31 मे 2022 रोजी सिद्धिविनायक मंदिर धर्मशाळा या ठिकाणी मा. महासमदेशक होमगार्ड, नागरी संरक्षण, व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ठाणे, तसेच मा.  पोलीस अधीक्षक सो ठाणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने "आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराचे" उदघाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्मिता पाटील मॅडम, मा.प्रांत अधिकारी कल्याण चे श्री. अभिजित भांडे पाटील, मा. तहसीलदार सो श्री देशमुख, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. राजू वंजारी, हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मा. अपर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी उपस्थित 150  होमगार्ड यांना  हे प्रशिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करावे असा बहुमोल सल्ला दिला. राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे प्रशिक्षण दि 3 जून पर्यंत चालणार आहे.

Share This

titwala-news

Advertisement