टिटवाळ्यात गॅस लिकेजने कर्मचारी भाजला
टिटवाळा स्टेशन जवळील गणेश दर्शन इमारतीतील तिसऱ्या माळ्यावर राहणारे नागरे यांच्या घरातील गॅस लिकेज झाल्यामुळे नागरे यांनी एच पी गॅस मध्ये तक्रार केली होती. सदरील गॅस लिकेज दुरुस्ती करण्यासाठी कर्मचारी दिलीप हरड हा आला असता त्याने गॅस सिलेंडर चा रेग्युलेटर काढून नॉब दुरुस्त करीत असताना सिलेंडर मधून गॅस निघाल्याने घरातील देव्हाऱ्या समोर पेटत असलेल्या दिव्याने सदरील गॅस चा भडका उडाल्याने सदरील कर्मचारी हा भाजला.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण केले असून जखमी एचपी कंपनीचा दिलीप हरड यास उपचारासाठी महागणपती इस्पितळात दाखल केले असल्याची माहिती मॅनेजर भानुदास देशमुख यांनी टिटवाळा न्यूज ला दिली.