टिटवाळ्यात रक्तदान शिबिर संपन्न
Raju Tapal
December 13, 2021
30
टिटवाळ्यात रक्तदान शिबिर संपन्न
रविवार रोजी विदयामंदीर मांडा शाळा, टिटवाळा पूर्व येथे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजक आऊसाहेबांची सावली(कल्याण), डॉ.निता पाटील फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य), रत्नसिंधू कोकण रहिवासी मंडळ, (टिटवाळा), स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ(टिटवाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने समर्पण ब्लड बँक, घाटकोपर-मुंबई यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व महागणपती हॉस्पिटल, टिटवाळा यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर जनरल चेकअप, (बीपी, शुगर ), सीबीसी ,इतर आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळातील व इतर ठिकाणाहुन नागरिक, रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सदर कार्यक्रमाची सुरवात जेष्ठ नागरिक व कोकण रहिवासी मंडळाचे संस्थापक विवेकानंद कानेटकर यांच्या हस्ते गजाननाला वंदन करुन महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, घटनेचे थोर शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व माँ जिजाऊचे स्मरण वंदन करून केले. तसेच उपस्थित मान्यवर स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुप्रिया आचरेकर, रत्न सिंधु कोकण रहिवासी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद सावंत, आऊसाहेबांची सावलीचे अध्यक्ष जितेंद्र तेलवणे यांनी दिप प्रज्वलन करुन शिबिराला सुरुवात झाली.
तसेच आयोजकांनी पहिल्यांदा रक्त दान,मोफत आरोग्य शिबिर केले असता ३५ रक्त दाते यांनी रक्त दान केले व ६६ आरोग्य तपासणी चा लाभ नागरिकांनी घेतला.
तसेच यावेळी समर्पण ब्लड बँक,घाटकोपर ची टिम व महागणपती हॉस्पिटल,टिटवाळा ची टिम यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व मान्यवर वैदही नादंगावकर, संजित चव्हाण, संदीप आचरेकर, स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ, डॉ निता पाटील फाऊंडेशन,आऊसाहेबांची सावली,रत्न सिंधू कोकण रहिवासी मंडळ,टिटवाळा, गणगर्जना ढोल ताशा पथक,टिटवाळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते रक्त दान करणाऱ्या रक्त दाते यांना प्रमाणपत्र, किचेन व गुलाबाचे फुल देण्यात आले.
या शिबिराला दिलीप परब, राजेंद्र सावंत,दुर्गा पांडे, प्रभाकर व्यापारी,
दामोदर वाडेकर,अग्निहोत्री, चारुशीला मंचरकर,मनीषा माने, नयना व्यापारी,ओमकार व्यापारी,श्रावणी आचरेकर, सानिका तोडणकर,आर्यन आचरेकर, प्रथमेश कडव आयोजक मंडळाचे कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी संपन्न होण्यासाठी समीर मेस्त्री, रावजी केळुसकर, रविंद्र दसुरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विद्यामंदिर शाळाने सदर शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
Share This