टिटवाळ्यात वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी
ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात.
टिटवाळा बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या सणासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून वडाची फांदी,पाच फळे,दोरा,काळे मणी,नवीन साडी तसेच उपवासाचे फळ घेण्यासाठी व इतर साहित्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.