टिटवाळ्यातील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त खिचडी वाटप
टिटवाळा रेल्वे स्टेशन पूर्व येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या तर्फे तब्बल ४०० किलोची खिचडी वाटप करण्यात आली.
टिटवाळा रेल्वे स्टेशन जवळ इस्वी सण 1852 मधील पुरातन हनुमान मंदिर आहे. माजी नगरसेवक सुरेश भोईर हे सातत्याने मंदिराच्या देखभाल व सुशोभीकरणासाठी नेहमीच पाठपुरावा करीत आसतात. तुंगारेश्वर येथील सदानंद महाराज यांच्या हस्ते हनुमान मंदिराच्या बाजूलाच शिवपिंडी बसविण्यात आली, परिसरातील भाविक महाशिवरात्री निमित्ताने दशैन घेण्यासाठी येत आसतात, या वर्षी देखील महाशिवरात्री निमित्ताने परिसरातील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच गर्दी केली होती. कोरोना आजाराचे नियम पाळून भाविक रांगेत दर्शन घेत होते, मंदिरात फुलांची सजावट प्रदिप भोईर यांनी केली होत.
यावेळी भाविकांना श्री हनुमान जीर्णोद्धार सेवा समिती कडून चारशे किलो खिचडी वाटप करण्यात आली,
यावेळी माजी नगसेवक सुरेश भोईर, भाजपचे कल्याण जिल्हा सचिव प्रदिप भोईर, गणेश भोईर, उमेश भोईर, किरण आगस्ती, सतीश गुप्ता,तसेच हरहर महादेव ग्रुपचे विशाल उगवेकर,सचिन गवळी, जय भोसले, पारस भोसले, दिनेश मथे,सुभाष पालांडे, सुभाष बागळ आदी उपस्थित होते