तो दिवस भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारा दिवस ; आमदार ऍड.अशोक पवार
लखीमपूर खेडी येथील आंदोलनावर जबाबदार मंत्र्याच्या मुलाने गाडी अंगावर घालून शेतक-यांना चिरडून गेला तो दिवस भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांंनी केले .
पुणे सोलापूर महामार्गावरील लोणीकाळभोर येथे लखीमपूर खेडी येथील घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार पवार बोलत होते.
जय जवान जय किसान ,भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय ,भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
लखीमपूर खेडी घटनेचा निषेध करण्यासाठी , शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याचे आमदार पवार यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन,जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य सोनबा चौधरी, किसान सेलघे रोहिदास टिळेकर, रामभाऊ तुपे, सुभाष टिळेकर, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, माजी जिल्हाध्यक्ष नंदू काळभोर, सरपंच राजाराम काळभोर , सनी चौधरी, विठ्ठल शितोळे, सुरज चौधरी,अण्णा चौधरी, अमित चौधरी, पांडुरंग काळभोर ऋषिकेश काळभोर,आदी यावेळी उपस्थित होते.
उरूळीकांचन, लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती येथे बंद पाळण्यात आला.
लखिमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने केलेल्या महाराष्ट्र बंद आवाहनाला खडकवासला विधानसभा मतदार संघात ,,सिंहगड रस्ता परिसरात व्यावसायिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.
हडपसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू भाजी मंडईत कडकडीत बंद पाळत व्यापारी व विक्रेत्यांनी बंदला प्रतिसाद दिला. मगरपट्टा ते पंधरा नंबर दरम्यानच्या परिसरात व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. गाडीतळ, ससाणेनगर, रस्ता, भाजी मंडई चौक, मगरपट्टा चौक ,मांजरी याठिकाणची दुकाने पूर्ण बंद होती.
जुनी सांगवी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, नवी सांगवी पिंपळे गुरव येथे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप दापोडी येथे नगरसेविका स्वाती काटे, राजू बनसोडे यांनी व्यापा-यांना बंद पाळण्याबाबत आवाहन केले होते. जुनीसांगवी, नवी सांगवी दापोडी परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.
पोलीस प्रशासनाकडून मोक्याच्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
महाविकास आघाडीच्या वतीने वानवडीतील संविधान चौकात संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र बंदच्या रॅलीला सुरूवात करण्यात आली.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखाली उत्तर प्रदेशातील शेतक-यांना चिरडण्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यातील एम जी रोड, सेन्टर स्ट्रीट, भीमपुरा, मोदीखाना,कोळसेगल्ली, गवळीवाडा,घोरपडी आदी ठिकाणी दुकाने बंद होती. लष्कर भागात सकाळी आठ वाजल्यापासून बंदला सुरूवात झाली.