महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आता अग्नी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून fire extinguisher ची सुविधा!
बारावे येथील शाळेपासून आग प्रतिबंधक उपकरणांबाबत प्रशिक्षणास प्रारंभ!
महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्राधान्याने महापालिका शाळांचा कायापलट करण्याचा संकल्प केला आहे ,त्यानुसार शाळा दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार आणि शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळा स्वच्छ,सुंदर आणि सुरक्षित असाव्यात या दृष्टिकोनातून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये साडेसहाशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत
त्याचप्रमाणे शाळातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये fire extinguisher बसविण्यात आली आहेत. या fire extinguisher चा वापर कसा करावा, आग लागण्याची प्रमुख कारणे काय, आग कशी विझविता येते याची माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व केंद्र अधिकारी विनायक लोखंडे यांनी अत्यंत सुलभ भाषेत बारावे येथील शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली आणि तसे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांमार्फत आणि त्यांचे शिक्षकांमार्फत आज करवून घेतले. आता महापालिकेच्या उर्वरित शाळांमध्येही हे प्रशिक्षण तेथील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांवरही अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थी वर्गास दिले जाते.
कोरोना च्या कालावधीत टाटा आमंत्रण येथे बसवलेल्या fire extinguisher चा पुनर्वापर महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. यावेळी महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे व बारावे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.