मुंबई दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि कार चा अपघात.. एक जखमी अत्यावस्थेत
वासिंद परिसरातील विदयुत पुरवठा खंडित..
काल संध्याकाळी 7:30 च्या सुमारास नाशिक हुन मुंबई ला जाणाऱ्या एका भरगावं ट्रक ने नाशिक मुंबई महामार्गवर वासिंद -खातिवली परिसरात एका कार ला धडक दिली आणि या धडकेने कार विद्युत खांबावर धडकली आहे .
यात विद्युत खांबाचे नुकसान झाले असून वासिंद आणि खातिवली परिसरातील विजपुरवठा खंडित झाला आहे. सदर अपघात खातिवली परिसरात धिंग्रा हॉटेल जवळ झाला आहे. या अपघातात बाईक स्वार सुद्धा मध्ये आल्याने, बाईक स्वार गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे ला घेऊन गेल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे..
वासिंद पोलीस पथक सदर घटनेचा अधिक तपास करित आहेत.