ट्रक अपघातात नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे दोघे जखमी
Raju tapal
October 17, 2021
32
ट्रक अपघातात नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे दोघे जखमी ; मलकापूरजवळची घटना
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथून कांदे भरून कोल्हापूरला जात असलेल्या एम एच ०४ सीपी ५१२४ या ट्रकचा स्टेअरिंग रॉड अचानक खराब झाल्याने मलकापूरजवळील वारणा हॉटेल समोर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने महामार्गाची सुरक्षा रेलिंग जाळी तोडून ट्रक पलटी झाल्याची घटना घडली.
कांदा बागायतदार प्रणय जाधव वय १९ वर्षे चालक नवनाथ मारूती भुजबळ रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर हे दोघेजण अपघातात जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच क-हाड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खलिल इनामदार, श्री.जाधव, दस्तगीर आगा, सिकंदर उघडे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी पाठविले. अपघातामुळे बराच काळ विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी पूर्ववत केली
Share This