ट्रक पलटी करून दारू चोरीचा बनाव करणा-या दोघांना अटक
Raju Tapal
November 02, 2021
65
ट्रक पलटी करून दारू चोरीचा बनाव करणा-या दोघांना अटक ; बारामती गुन्हे शोध पोलीसांची कारवाई
मॅकडॉल कंपनीतून दारू वाहतूक करणारी ,ट्रक पलटी करून अपघाताचा बनाव करणा-या दोघांना बारामती गुन्हे शोध पोलीसांनी अटक केली.
चालक अंकुश बेंद्रे रा.बारामती, मालक आजिनाथ जराड रा.बारामती अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणा-या मॅकडॉल कंपनीतून दारूच्या बॉक्सचा ६५ लाख ८७ हजारांचा माल घेवून जाणा-या ट्रकचा अपघात झाला होता.
उंडवडी कडेपठार याठिकाणी ट्रकचा अपघात करून ४० लाखांच्या चोरीचा बनाव करून नंदकुमार क्षीरसागर रा.गोतोंडी ता.इंदापूर जि.पुणे याच्या मदतीने ट्रकमधील दारूचे ५०० बॉक्स असा एकूण ४० लाखांचा माल एका गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता.
त्यांचा बनाव उघडकीस आला.
चालक अंकूश बेंद्रे व अजिनाथ जराड दोघेही रा.बारामती या दोघांवर अपघात करून ४० लाखांच्या चोरीचा बनाव करून अपहार केल्याचा गुन्हा बारामती पोलीसांनी दाखल केला.
ट्रक पहिल्यांदा भवानीनगरच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरून गुन्हे शोध पथकाने कसून चौकशी केली असता फिर्यादींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपघाताचा बनाव करत त्याचा मित्र नंदकुमार क्षीरसागर रा.गोतोंडी ता.इंदापूर याच्या गोडावूनमध्ये ४० लाख रूपये किंमतीचे ५०० बॉक्स ठेवण्यात आले. उंडवडी मधून जात असताना ट्रकला अपघात झाल्याचे भासविले.
ट्रक पलटी करून गावातील लोकांनी दारूचा मुद्देमाल उचलून नेल्याची फिर्याद दिली होती.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खरात, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहूल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, सदाशिव बंडगर, अनिकेत शेळके या पोलीस पथकाने ही कारवाई केली.
Share This