ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून एस आर पी एफ जवानाचा मृत्यू ; दौंड शहरातील घटना
ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना दौंड शहरात घडली.
दौंड शहरातून जाणा-या नगर, दौंड, ,कुरकुंभ, ,फलटण महामार्गावर २ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजता राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ७ परिसरातील म्हसोबा मंदिरासमोर हा अपघात झाला.
एम एच ४२ ए एम १७४५ या क्रमांकाच्या दुचाकीवरील गणवेशातील पोलीस जवान ऊसाची वाहतूक करणा-या एम एच १२ जी.एन ६५३२ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून ठार झाले.
ठार झालेल्या एस आर पी एफ पोलीस जवानाचे नाव समजू शकले नाही.
त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला.
त्यांच्या मृतदेहाशेजारी काळ्या रंगाचे हेल्मेट आढळून आले. ऊसाच्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या.
दुस-या अपघातातील घटनेत कळंब येथून जवळच असलेल्या पिंपळगाव येथील पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास व्यायामास गेलेल्या दोघा तरूणांचा आयशर वाहनाने धडक देवून चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
विवेक वासुदेव ठाकरे वय - ४३, अमोल बबन गाडेकर वय - ३८ रा.पिंपळगाव यांचा या घटनेत मृत्यू झाला.
कळंब बाभूळगाव रस्त्यावर ते आष्टी चौफुली येथे व्यायाम करत होते.
रस्त्याच्या काठावर व्यायाम करत असताना दोघांना अज्ञात आयशर वाहनाने धडक देवून चिरडले.
पंकज सुरेश उईके यांच्या जबानीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.